अकोला जिल्ह्यात काल रात्रीच्या सुमारास मूर्तिजापूर तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. या पावसामुळे टिपटाळा, वाघजाळी, ब्रम्ही, जितापूर, खापरवाडा, टाकवाडा, गुंजवाडा, साखरी, दुर्गवाडा, तसेच सांगवी या गावामध्ये शेतीपिकाचे मोठे नुकसान झाले आहे.