बदनापूर तालुक्यात गेल्या दोन तीन दिवसापूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे 4 महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांची कपाशी आणि सोयाबीन यासह इतर पिके पाण्याखालीच असल्याने मोठे नुकसान होत आहे. पाण्यात असलेली पूर्ण कपाशी काळसर पडून जळत आहे.