गोंदिया जिल्ह्यात मागील पाच दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा जोर आजही कायम आहे. रात्रीपासून काही ठिकाणी रिमझिम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस सुरू असून, आज जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. सलग पावसामुळे नद्यांना पूर आला आहे.