परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यात झालेल्या जोरदार पावसानंतर करपरा नदीला पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. पुराच्या पाणीमुळे शेती पिकांना मोठे नुकसान झाले असून, नुकतीच खरीपची पेरणी झालेल्या पिकांना पाण्याने पूर्णपणे उध्वस्त केले आहे.