लातूर जिल्ह्यातल्या उदगीरमध्ये मोठा पाऊस झाला आहे, या पावसाने शहरातल्या रस्त्यांवर सगळीकडे पाणीच पाणी झाले आहे. उदगीरच्या नांदेडनाका भागात नाल्याचं पाणी रस्त्यावरून वाहू लागल्याने वाहतुकीला अडचण झाली आहे. रस्त्याला तलावाचे स्वरूप आल्याने नागरिकांचीही अडचण झाली आहे.