मुंबईसह उपनगरात जोरदार पाऊस सुरू आहे आणि अंधेरी सबवेमध्ये पाणी भरल्यानंतर तो बंद करण्यात आला आहे. फक्त सबवेच नाही तर आजूबाजूच्या रस्त्यांवरही पाणी साचायला सुरुवात झाली आहे. सबवे दोन्ही बाजूंनी बॅरिकेडिंग करून बंद करण्यात आला आहे. बीएमसीचे कर्मचारी पंपांच्या साहाय्याने पाणी काढण्याच्या प्रयत्न करत आहेत.