सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ व सावंतवाडी तालुक्यात आज प्रचंड गडगडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. सह्याद्री पट्ट्यात दुपारनंतर प्रचंड गडगडाट पाहायला मिळाला. तर कुडाळ तालुक्यातील आंबेरी व मोरे गावातील परीसरात गारांचा पाऊस पडला. तब्बल अर्धातास या भागात गारा पडत होत्या त्यामुळे येथील नागरिकांनी या गारा उत्सुकतेने आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केल्या.