नाशिकच्या सुरगाण्याच्या पश्चिम पट्टयात जोरदार पाऊस आहे. अंबिका नदीच्या उपनदीला पूर आल्याने पिंपळसोंड, उंबरपाडा रस्त्यावरील फरशी पुलावरून पुराचे पाणी वाहत असल्याने वाहन चालक व नागरिक जीव धोक्यात घालून प्रवास करीत आहेत. पुलाची उंची कमी असल्याने पावसाळ्यात दरवर्षी हे पुल पाण्याखाली येत असल्याने वाहतूक ठप्प होते.पुलांची उंची वाढविण्याची मागणी स्थानिक नागरिक करीत आहे.