ठाणे : हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केल्यानंतर मीरा भाईंदरमध्ये रात्रभर मुसळधार पाऊस सुरु आहे. मीरा भाईंदर पूर्वेकडील काशिनगर परिसरात मूळधार पाऊस सुरू असून पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. पुढील दोन दिवस रेड अलर्ट जारी करण्यात आला असून जोरदार मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मीरा भाईंदरमध्ये अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचल्याच्या घटना घडत आहेत. नागरिकांनी गरज असेल तरच घराबाहेर पडा असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.