गेल्या अनेक दिवसांपासून पावसाची वाट पाहणाऱ्या पुरंदरवासीयांना अखेर मोठा दिलासा मिळाला आहे. पुरंदर तालुक्याच्या डोंगर पट्ट्यात झालेल्या दमदार पावसामुळे ऐतिहासिक सासवड शहरातून वाहणारी कऱ्हा नदी दूथडी भरून वाहू लागली आहे. अनेक दिवसांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर नदीला पाणी आल्याने संपूर्ण तालुक्यात आनंदाचे वातावरण आहे.