जून महिन्यात भंडारा जिल्ह्यात पाहिजे त्या प्रमाणात पाऊस पडला नाही. परिणामी, जिल्ह्यातील शेतकरी पीक पेरणीला घेऊन चिंताग्रस्त झाला होता. मात्र, आता काल दिवसभर रिमझिम तर, रात्रीच्या सुमारास पावसानं जोरदार हजेरी लावली. आज सकाळपासून पुन्हा एकदा भंडारा जिल्ह्यात पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. हवामान विभागानं आज भंडारा जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तविला असताना आता सकाळपासून सुरू झालेल्या या पावसानं जिल्ह्यातील भात उत्पादक शेतकऱ्यांसह पालेभाजी उत्पादक शेतकऱ्यांनाही मोठा दिलासा मिळालाय.