वर्ध्याच्या आष्टी तालुक्यात रात्रीच्या सुमारास जोरदार पाऊस झाला आहे. नरसिंगपूर येथे पुराचे पाणी शाळेत गेल्याने शैक्षणिक साहित्य, शालेय पोषण आहाराचेही नुकसान झाले आहे. नरसिंगपूर शिवारात नाल्याच्या पुरात जवळपास आठ शेळया वाहून गेल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.