गेल्या अनेक दिवसाच्या विश्रांतीनंतर आज जालना शहरात मुसळधार पावसाने हजेरी लावली. पावसाचा जोर अधिकच असल्यामुळे अनेक ठिकाणी रस्ते जलमय झाले तर काही ठिकाणी पाणी देखील वाहत असल्याचं पाहायला मिळालं. यामुळे नागरिकांना त्रासाचा सामना करावा लागला.