मुंबईतील कांदिवली, बोरिवली, मालाड, अंधेरी, दहिसर, गोरेगाव, विलेपार्ले, सांताक्रूझ, खार, वांद्रे या उपनगरांसह सर्व भागात गेल्या चार दिवसांपासून सतत पाऊस पडत आहे. अनेक सखल भागात पाणी साचलं आहे. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर हवामान खात्याने आज रेड अलर्ट जारी केला आहे.