जळगावच्या मुक्ताईनगर व रावेर तालुक्यात काल अनेक ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. पुराचे पाणी अनेकांच्या घरात घुसल्याने नुकसान झाले आहे. रावेर जिल्हा परिषद शाळेत पाणी शिरले होते. मुक्ताईनगरच्या करकी अंतुर्ली परिसरालाही पावसाचा तडाखा बसला.