जळगाव मध्यप्रदेशच्या बैतूल येथे झालेल्या पावसामुळे तापी नदीला पूर आला आहे. हतनूर धरणाचे 22 दरवाजे 1 मीटरने उघडले. धरणातून 49 हजार क्यूसेकने पाण्याचा विसर्ग तापी नदी पात्रात होत आहे. धरण क्षेत्रातील नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.