बुलढाणा जिल्ह्यात काल सायंकाळी आणि रात्री वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला.. त्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झालेय .. शेतात उभा असलेला गहू झोपल्याने नुकसान झालाय.. परिणामी जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून मागील आठवड्यात सुद्धा वादळी वाऱ्यासह गारपीट झाली होती ..