वाशिमच्या रिसोड तालुक्यातील नेतंसा परिसरात कांचन नदीला आलेल्या पुरामुळं कोयाळी जाधव ते नेतंसा या गावांना जोडणारा मुख्य रस्ता तब्बल 200 ते 300 मीटरपर्यंत खचलाय. तर तोन ते तीन पूलही खचलेत त्यामुळं वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे. मागील वर्षीही हा रस्ता काही प्रमाणात खचला होता. त्यावेळी ग्रामस्थांनी वारंवार तक्रारी करूनही या रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली नव्हती. अखेर यंदाच्या पुरात हा रस्ता पूर्णपणे वाहून गेला असून नागरिकांना पर्यायी मार्गाचा आधार घ्यावा लागत आहे.