वर्धा जिल्ह्यातील कारंजा घाडगे तालुक्यातील धावसा शिवारात मुसळधार पावसाने शेती पिकांचे नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीन, कपाशी, संत्र्याचंही नुकसान झालं आहे. शेताचे बांध फुटून पिकांवर गाळ साचला आहे. पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.