नवी मुंबईत आज पहाटे पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. गेल्या काही दिवसांपासून उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना या पावसामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. शहरात ढगाळ वातावरण असून विविध भागांमध्ये मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार दिवसभर पावसाची शक्यता असून विजेच्या कडकडाटासह पावसाची हजेरी लागली आहे.