सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात मुसळधार पाऊस झाल्याने ओढ्या नाल्यांना नदीला पूर आल्याने 50 ते 60 विद्यार्थ्यांना घेऊन येणारी एसटी बस नदी पलीकडे अडकली. आगळगाव येथील धाकट्या नदीला पूर आल्यामुळे ग्रामीण भागातील वाहतूक ठप्प झाली. बार्शी ते खडकोणी रात्री मुक्कामी गेलेली बस आगळगाव परिसरात काल रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे नदीच्या त्या बाजूला अडकली. गावातील विद्यार्थी बसमध्ये असल्याने विद्यार्थ्यांच्या शाळेचा खोळंबा झाला आहे. तसेच या पुला वरून पाणी वाहत असल्याने उंबरगे, भानसळे,खडकोनी, कळंबवाडी गावाचा संपर्क तुटला आहे.दरम्यान पुलावरून पाणी वाहत असल्यास पूल ओलांडू नये असे आवाहन प्रशासनाने केले.