भंडारा जिल्ह्याला सलग तीन दिवसापासून पावसाने झोडपून काढले आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून भंडाऱ्याच्या खात रोड परिसरातील वैशाली नगर येथे काही नागरिकांच्या घरी पाणी शिरले. तर काही नागरिकांच्या घराच्या दारापर्यंत दोन ते तीन फूट पाणी असल्याने घराबाहेर निघणे कठीण झाले आहे.