ऑपरेशन टायगर प्रकरणात नाव आलेल्या सहा खासदारांच्या सुरक्षेबाबत राज्य गुप्तचर विभागाने मोठा निर्णय घेतलाय.या सर्व खासदारांना Y प्लस दर्जाची सुरक्षा मंजूर करण्यात आली असून त्यानुसार 24 तास पोलीस बंदोबस्त तैनात राहणार आहे. निवासस्थानासह दौऱ्यादरम्यानही सुरक्षा वाढवण्यात येणार असून या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे.दरम्यान, शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या निवासस्थानी आधीच कडक पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.त्यांच्या सुरक्षेसाठी मोबाईल सर्व्हेलन्स व्हॅनसह बंदुकधारी पोलिसांची तैनाती करण्यात आली असून संपूर्ण परिसरात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.