सांगलीच्या कासेगाव या ठिकाणी जयंत हिंदकेसरी बैलगाडी शर्यतींचा मैदान आयोजित करण्यात आला आहे. 26 मार्च रोजी रामनवमीच्या निमित्ताने भव्य बैलगाडी शर्यती पार पडणार असून बैलगाडी शर्यतीच्या निमित्ताने लाखो रुपयांची बक्षिसा बरोबर महाराष्ट्रात पहिल्यांदाचं बैलगाडी शर्यती मधील सहभागी बैलगाडी चालक व बैलगाडी शर्यती पाहण्यासाठी येणाऱ्या महिलांना मोफत हेलिकॉप्टर राईड आयोजित करण्यात आली आहे.