पंढरपूरच्या इस्कॉन मंदिरात भाविकांसाठी एक अनोखे आकर्षण निर्माण झाले आहे. प्रसिद्ध अभिनेत्री आणि खासदार हेमा मालिनी यांनी मंदिराला अत्याधुनिक रोबोटिक हत्ती भेट दिला आहे. खऱ्या हत्तीप्रमाणे दिसणारा हा रोबोटिक हत्ती चालतो, सोंड व कान हलवतो आणि सोंडेतून पाण्याचा अभिषेकही करतो. त्यामुळे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसह लहान मुलांमध्येही या रोबोटिक हत्तीबाबत मोठे आकर्षण निर्माण झाले आहे.