सिंधुदुर्गातील सावंतवाडी शहरातील बाहेरचावाडा परिसरात 14 गव्यांच्या कळपाचा वावर दिसून आला. दिवसाढवळ्या वस्तीलगत येऊन या गव्यांच्या कळपाचा मुक्त संचार पाहायला मिळाला. बिनधास्त वावरणारे हे गवे आक्रमक असल्यामुळे ते हल्ला करू शकतात. त्यामुळे या गव्यांचा योग्य तो बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी स्थानिकांकडून वनविभागाकडे करण्यात आली आहे.