पहिल्याच पावसामध्ये मुंबईतील अनेक भागांमध्ये पाणी साचलं. यामध्ये केईएम सारखं गजबजलेलं रुग्णालयही आहे. पहिल्याच पावसात रुग्णालयात पाण्याचं तळं साचल्याचं पाहायला मिळालं. या प्रकरणाची गंभीर दखल आता मुंबई हाय कोर्टाकडून घेण्यात आली आहे. सुमोटो याचिकेवर सुनावणी करताना मुंबई हाय कोर्टाकडून मुंबई महापालिकेला नोटीस पाठवण्यात आली आहे.