नाशिक जिल्ह्यातील पेठ तालुक्यातील हरणगावात मध्यरात्री बिबट्याचा थरार दिसला. बिबट्या थेट शेतातील घरातच घुसला. सुभाष रघुनाथ भरसट यांच्या राहत्या घरात बिबट्या शिरला. कुटुंबियांच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला.