शेकापच्या प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी मंत्री भरत गोगावले यांचा कथित व्हीडिओ माध्यमांसमोर दाखवला. पाटील यांनी या व्हीडिओद्वारे गोगावले यांच्यावर गंभीर आरोप केले. त्यावरुन आता तीव्र पडसाद उमटले आहेत. रायगड जिल्ह्यातील रोहा महाड आणि माणगावमध्ये शिवसेनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले. कार्यकर्त्यांनी चित्रलेखा पाटील यांच्या विरोधात निदर्शने केली.