करमाळा शहरात हिंदू मुस्लिम ऐक्याचे दर्शन पाहायला मिळाले आहे. गणरायाच्या विसर्जन मिरवणुकीवर मुस्लिम बांधवाकडून जामा मशिदीमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. ही प्रथा मागील 39 वर्षांपासून सुरु असून यंदाचे 40 वं वर्ष आहे. तसेच प्रत्येक गणेश मंडळाच्या अध्यक्षांचा शाल ,फेटा, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.