बीडच्या आष्टी तालुक्यातील गहूखेल येथे सय्यद बाबा दर्ग्याला गेल्या अनेक दशकांपासून हिंदू बांधवांकडून कावडीने पाणी घातले जाते. गुढीपाडवा आणि ईद या अशी दिवस सय्यद बाबा दर्गा येथील मोठी यात्रा असते. यावर्षी देखील ही यात्रा मोठा उत्साहात संपन्न झाली. हिंदू आणि मुस्लिम बांधव एकत्र आल्याचे दिसून आले. तर हिंदू बांधवांनी कावडीने पाणी आणून सय्यद बाबा दर्ग्याला घालत गेल्या अनेक दशकांपासून सुरू असलेली परंपरा कायम ठेवली.