हिंगोली जिल्ह्यात रेशनच्या तांदळातील गैरव्यवहार उघडकीस आला आहे. जिल्हा पुरवठा गोदामात जाण्यापूर्वीच हमालांकडून पोत्यातून तांदूळ काढला जात असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामुळे 50 किलोऐवजी 40-45 किलो तांदूळ मिळत असल्याच्या तक्रारी अनेक रेशन दुकानदारांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केल्या आहेत. आता या धक्कादायक व्हिडीओनंतर जिल्हाधिकारी काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.