जळगाव जिल्ह्यात अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. भडगाव तालुक्यातील गुढे परिसरात शेवगा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अचानक आलेल्या पावसासह जोरदार वादळी वारा आणि गारपिटीमुळे झाडांवरील शेवग्याच्या शेंगा खाली पडल्याने उत्पादनाचे नुकसान झाले आहे.