सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आगळीवेगळी व ऐतिहासिक परंपरा असलेल्या सांगेली गिरोबा उत्सवाचा थाटात प्रारंभ झाला आहे. सुमारे ३५० वर्षांची गौरवशाली ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या या उत्सवासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली असून आज ढोलताशांच्या गजरात व ''हर हर महादेव''च्या जयघोषात प्रारंभ झाला.