रत्नागिरी- कोकणात आजपासून होळी उत्सवाची धूम सुरू होणार आहे. फाग पंचमीपासून होळी उत्सवाची सुरुवात होत आहे. जिल्ह्यात सुमारे १३१५ सार्वजनिक तर २८५४ खासगी होळ्या उभ्या राहणार आहेत. गावागावात आजपासून ढोल ताशांचा गजर सुरू होणार आहे. अनेक गावात ग्रामदेवतेला रुपे लागली असून गावागावात आज होळीचा पहिला होम लागणार आहे.