नंदुरबारच्या सातपुड्याच्या दुर्गम डोंगररांगांमध्ये होलिका उत्सवाला उत्साहात सुरुवात झाली आहे. अक्कलकुवा तालुक्यातील राजा पांठा गाडा ठाकूर यांच्या नावाची सातपुड्यातील डबा येथील पहिली मानाची होळी प्रज्वलित करण्यात आली. मोरीराही देवाच्या होळीसाठी संपूर्ण सातपुड्यातील आदिवासी बांधव एकत्र येत पारंपरिक पद्धतीने हा उत्सव साजरा करत आहेत.