पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, पुण्यातील कॅम्प परिसरामध्ये कारचं टायर निघालेलं असताना देखील चालक तशीच भरधाव वेगार कार पुढे नेत असल्याचा प्रकार समोर आला आहे. अखेर एका तरुणानं धाडस करून या गाडीचा पाठलाग करत ही कार थांबवली, त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.