बीड तालुक्यातील नेकनूरमध्ये रात्रीतून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला आहे. नेकनूर येथील मिरची बाजार परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्याची मागणी शिवप्रेमींकडून गेल्या अनेक दिवसांपासून होत होती. आज अखेर शिवप्रेमींनी रात्रीतून नेकनूरमध्ये हा अश्वारूढ पुतळा उभारला आहे. शिवाजी महाराजांचा पुतळा उभारल्याने तोफा वाजवून शिवप्रेमींकडून आनंद व्यक्त करण्यात आला तर महिलांनी रांगोळी काढली. हा पुतळा नेमका कोणी उभारला आहे आणि परवानगी आहे की नाही? याबाबतची अद्याप माहिती मिळू शकलेली नाही.