अश्वांची पंढरी म्हणून ओळख असलेल्या सारंगखेड्याची यात्रा १८ व्या शतकापासून सुरू असल्याची ऐतिहासिक नोंद आहे. या पारंपरिक अश्व बाजारात देशभरातून जातीवंत आणि उंची घोडे दाखल होत असतात. चार डिसेंबरपासून सारंगखेड्याच्या यात्रेला सुरुवात झाली असून आतापर्यंत यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.