गर्भाशय मुख कॅन्सर हा महिलांमधील दुसरा सर्वात सामान्य कॅन्सर असून, दरवर्षी लाखो महिलांना याचा फटका बसतो. यावर मात करण्यासाठी केंद्र सरकारने १४ वर्षांच्या मुलींसाठी मोफत HPV लसीकरण मोहीम सुरू केली आहे. यामुळे वयाच्या ३० वर्षांपर्यंत कॅन्सरचा धोका ८५ टक्क्यांहून अधिक कमी होऊ शकतो.