अक्षय तृतीयेनिमित्त नवी मुबंईतील एपीएमसी बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात आंब्याची आवक झाल्याचं पहायला मिळालं. महाराष्ट्र राज्यातून 58 हजार तर इतर राज्यातून 35 हजार आंबे एपीएमसी बाजारात विक्रीसाठी आले होते. आंब्याला प्रती पेटी दीड ते चार हजार एवढा दर मिळाला.