ख्रिसमस सुट्टीमुळे राज्यातील अनेक प्रेक्षणीय स्थळांवर पर्यटकांची गर्दी वाढली आहे. कोल्हापूरमधील श्री अंबाबाई मंदिरातही मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. सकाळपासूनच मंदिर परिसरात भाविकांच्या रांगा लागल्या असून दर्शनासाठी वेळ लागत आहे. राज्यातील विविध भागांसह परराज्यातूनही भाविक देवीच्या दर्शनासाठी आले आहेत. वाढत्या गर्दीमुळे मंदिर प्रशासनाकडून दर्शन व्यवस्था आणि सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे.