संकष्टी चतुर्थीच्या निमित्ताने रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात असलेल्या श्री वरदविनायक अष्टविनायक क्षेत्र महड येथे भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. राज्याच्या विविध भागांतून हजारो भाविक गणरायाच्या दर्शनासाठी महडमध्ये दाखल झाले आहेत. मंदिर परिसरात पहाटेपासूनच भक्तांची रांग लागली असून दर्शनासाठी सुमारे एक किलोमीटर लांब रांग लागल्याचे चित्र आहे.