पुण्याच्या भोर तालुक्यातील पळसोशी गावात, ग्रामदैवत वाघजाई देवी आणि श्री काळभैरवनाथ यात्रेनिमित्त भव्य कुस्ती मैदान भरविण्यात आलं. यामध्ये पुण्याच्या विविध भागातून आलेल्या 200 मल्लांनी सहभाग घेतला. यावेळी कुस्ती क्रीडा प्रकरातील सर्व वजन गटातील कुस्त्या घेण्यात आल्या. निकाली कुस्त्यांचा हा जंगी आखाडा पाहण्यासाठी कुस्ती शौकिनांची मोठी गर्दी जमली. यावेळी देवीच्या दर्शनासाठीही भाविकांनी मोठी गर्दी केली होती.