मालाडच्या इन्फिनिटी मॉलमध्ये एका दुकानाबाहेर ऑफर्सचा लाभ घेण्यासाठी तरुणांची मोठी गर्दी जमल्याची घटना समोर आली आहे. मॉलमधील एका दुकानात विशेष ऑफर जाहीर करण्यात आली होती. या ऑफरचा लाभ घेण्यासाठी शेकडो तरुणांनी दुकानाबाहेर गर्दी केली.