विदर्भाचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चिखलदऱ्यात पावसाळ्याची जादू खुलली असून, पहिल्याच विकेंडला पर्यटकांची विक्रमी गर्दी पाहायला मिळाली आहे.धुक्याची दाट चादर, कोसळणारे धबधबे आणि आल्हाददायक वातावरणाचा आनंद घेण्यासाठी दोन दिवसांत तब्बल १० हजारांहून अधिक पर्यटकांनी चिखलदऱ्याला भेट दिल्याची माहिती समोर आली आहे