होळीच्या दिवशी एकमेकांना बत्ताश्यांच्या गाठी देण्याची परंपरा विशेषतः ग्रामीण भागात आजही कायम आहे. लहान मुलांना भेट म्हणून या गाठी दिल्या जातात. अनेक कुटुंबांमध्ये बत्ताश्यांच्या गाठी गुढी पाडव्यापर्यंत जपून ठेवून गुढीला बांधण्याची परंपराही पाळली जाते. त्यामुळे सणाचा उत्साह वाढला असून वाशीमची बाजारपेठ सध्या आनंद आणि उत्साहाने भरून गेली आहे.