शेवया, घिवर, फेण्या, खजूर आणि सुकामेवा विकणाऱ्या दुकानांमध्ये ग्राहकांची गर्दी वाढली आहे. मुस्लीम बांधव सहकुटुंब बाजारात जाऊन ईदसाठी विविध वस्तूंची खरेदी करत आहेत. मिठाई, फळे, खजूर आणि सुकामेवा खरेदीसाठी बाजारपेठेत मोठी वर्दळ दिसून येत आहे. कपडे, पादत्राणे आणि इमिटेशन ज्वेलरीच्या दुकानांमध्येही ग्राहकांची चांगलीच गर्दी आहे. महिला आणि युवतींचा ईदच्या खरेदीत विशेष उत्साह दिसून येत आहे. तयार कपड्यांपेक्षा कुर्ता-पायजमा व पारंपरिक पठाणी ड्रेस शिवून घेण्याला अधिक पसंती मिळत आहे. अनेकजण कापड खरेदी करून खास ईदसाठी ड्रेस शिवून घेत आहेत. ईदच्या दिवशी शिरखुर्मा तयार करण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची मोठ्या प्रमाणात खरेदी होत आहे. व्यापाऱ्यांच्या मते यंदा ईद निमित्त बाजारात खरेदीची चांगलीच धूम पाहायला मिळत आहे.