अमरावती जिल्ह्यातील संत्रा बागा संकटात आली आहे. वातावरणातील बदलामुळे संत्र्यांची मोठी गळण होत आहे. विदर्भाचा कॅलोफोर्निया म्हणून अमरावती जिल्ह्यातील संत्रा उत्पादन करणाऱ्या भागाची ओळख आहे. नागपूरसोबतच अमरावतीमधील संत्र्याला संपूर्ण जगात मागणी असते. परंतु वातावरणामुळे इथला संत्रा उत्पादक डबघाईला आला आहे.