गोंदिया जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 (मुंबई-कोलकाता) वर मासुलकसा घाट परिसरात 6 महिन्यांपूर्वी उड्डाणपूल तयार करण्यात आला होता. जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे या पुलावर एक मोठं भगदाड पडलं आहे. उड्डाणपुलाला भेगा देखील पडल्या असून त्यावरील सुरक्षा भिंतसुद्धा खचली आहे. त्यामुळे पहिल्याच पावसात या बांधकाम करणाऱ्या कंपनीचं पितळ उघडं पडलं आहे.